हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे बैठकीतून आवाहन
भुसावळ- रीपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट) च्या माध्यमातून 25 ऑक्टोंबरला जिल्हास्तरीय लक्षवेधी महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रींय राज्यमंत्री रामदास आठवले व युती सरकारमधील काही मंत्री उपस्थित राहणार आहेत. यासाठी पक्षाच्या माध्यमातून तयारीला वेग देण्यात आला आहे. शहरातील विश्रामगृहात पक्षाची बैठक जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला प्रमुख मागदर्शक रमेश मकासरे, लक्ष्मण जाधव यांनी मार्गदर्शन करून मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले.
हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा -सूर्यवंशी
जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांचे मंत्रीपदानंतर जिल्ह्यात प्रथमच आगमन होत असलयाने या मेळाव्याला जिल्हाभरातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते येणार असल्याने लक्षवेधीची मेळाव्याची तयारी वेगाने सुरू केली असल्याचे सांगितले.
बैठकीला यांची होती उपस्थिती
विश्रामगृहात झालेल्या या बैठकीला आनंद खरात, भगवान सोनवणे, अनिल अडकमोल, सुदाम सोनवणे, शरद सोनवणे, प्रकाश सोनवणे, बाळू सोनवणे, नितीन बाम्हे, विश्वास खरात, प्रकाश तायडे, अरुण गजरे, विष्णू पारधे, भीमराव गजरे, यशवंत बैसाणे, गोरखनाथ सुरवाडे, गणेश पवार, भगवान निरभवणे, शाम संदानशिव, भीमराव रायसिंग, जगदीश पवार, संजय तायडे, विक्रम हिरोळे, सुधाकर बोदडे यांच्यासह जिल्हा व तालुक्यातील अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.