भुसावळ- अल्पवयीन युवतीच्या कानशीलात लगावत शिवीगाळ करून विनयभंग केल्याप्रकरणी रीपाइं पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या मुलाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा बाजारपेठ पोलिसांनी दाखल केला असून या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. शहरातील पंधरा बंगला तक्रारदारासह तिची बहिण शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास नाहाटा कॉलेज ते बंब कॉलनी मार्गाने जात असताना संशयीत अल्पवयीन आरोपीने युवतीच्या दुचाकीसमोर त्याची दुचाकी (क्र.एम.एच.19.डी.एफ.4547) लावून रस्ता अडवत फिर्यादीस शिवीगाळ करीत मोबाईल हिसकावून विनयभंग केल्याचा आरोप आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज पवार करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.