औरंगाबादेत पार पडली 26 वी ऑल इंडिया रोलर रीले स्केटींग स्पर्धा
भुसावळ- 26वी राष्ट्रीय रोलर रीले स्केटींग स्पर्धा 1 ते 3 जुन रोजी विभागीय क्रीडा संकुल, औरंगाबाद येथे झाली. या स्पर्धेत भुसावळातील आर्य उमेश नेमाडे याने एक रजत पदक पटकावले. आर्य हा भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांचा मुलगा आहे.
देशभरातील 450 खेळाडूंचा सहभाग
औरंगाबाद येथील विभागीय क्रीडा संकूलात 1 ते 3 जून दरम्यान 26 व्या ऑल इंडिया रोलर रीले स्केटींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत संपूर्ण देशातील 13 संघातील 450 खेळाडूंनी सहभाग होता. यामध्ये भुसावळातील आर्य उमेश नेमाडे, वैभव राजेंद्र गुरव व लुकेश विलास चौधरी तीन खेळाडूंनी महाराष्ट्र संघाकडून सहभाग नोंदविला. यात आर्य उमेश नेमाडे याने इनलाईन स्केटींग 10 ते 12 वर्ष या वयोगटात उत्कृष्ट प्रदर्शन करून रजत पदक प्राप्त केले व स्केयलॉन आणि स्पीट स्केटींग या प्रकारात आर्य उमेश नेमाडे, वैभव राजेंद्र गुरव व लुकेश विलास चौधरी यांच्या गटाने तृतीय स्थान पटकावून कांस्य पदक पटकावले. विजेत्या खेळाडूंचा औरंगाबादचे महापौर नंदकिशोर घोडेके व नितीन घोगटे यांनी सन्मान केला. स्पर्धेचे आयोजन सचिव भिकन अंबे यांनी केले होते. भुसावळचे खेळाडू हे सिल्व्हर लाईन स्पोर्टस् अकॅडमीचे असून दीपेश सोनार व पियुष दाभाडे यांनी त्यांना प्रशिक्षित व मार्गदर्शन केले. रजत पदक विजेता आर्य हा भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांचा मुलगा आहे. तिघाही खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.