जळगाव। जळगाव हा माझ्यासाठी नवीन जिल्हा असून येथील सर्व माहिती जाणून घेत चांगल्या कामासह रुग्णसेवा, शिस्त यांना आपले प्राधान्य राहील, अशी माहिती नवीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागुराव चव्हाण यांनी दिली. येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील भामरे यांचीे बदली झाल्याने त्यांच्या जागी डॉ. नागुराव चव्हाण यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. पदभार घेतल्यानंतर डॉ. चव्हाण यांनी संध्याकाळी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. या बाबत त्यांनी सांगितले की, येथील स्वच्छता, सुरक्षितता व नियोजन यावर लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे रुग्णसेवेसोबतच शिस्तीला आपण प्राधान्य देणार असल्याचा उल्लेख त्यांनी केला. जिल्हा रुग्णालयातील रिक्त जागांचा पाठपुरावा करून जास्तीत जास्त डॉक्टर मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात सुरक्षेसाठी येणार्या-जाणार्या प्रत्येकाची नोंद ठेवण्यात येईल, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
स्वच्छेतची केली सुचना
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील भामरे यांची वडाळा (मुंबई) येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी बीड येथील अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉ. नागुराव शिवाजी चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. चव्हाण यांनी सायंकाळी पदभार स्विकारल्यानंतर रूग्णालयातील सर्व वॉर्डांची पाहणी करत माहिती घेतली. यावेळी फार्मासिस्ट पी. डी. पाटील, परिचारिका रोजमेरी वळवी, मंगेश बोरसे, रवींद्र पवार, सुधीर करोसिया उपस्थित होते. डॉ. चव्हाण यांनी नवजात बालक, प्रसुती कक्ष, महिला वॉर्डची पाहणी केली. यात प्रसुती कक्षात खाटांची संख्या वाढविण्या सांगितले. वैद्यकिय अधिकार्यांसह अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे बर्याचदा अडचणी येत असतात. मशिनरी असली आणि कर्मचारी नसले. तरी त्याचा उपयोग होत नाही. शिवाय, कर्मचारी आहे आणि मशिनरी नाही, याबाबतची संपुर्ण माहिती घेवून पदभरतीची प्रक्रिया राबविणार. बीड जिल्ह्यात काम केले असून, जळगाव जिल्ह्यात देखील चांगल्यात चांगले काम करण्याचाच प्रयत्न राहणार असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले