मुक्ताईनगर- रूईखेडा वनविभागातील सारोळा येथील शेतकरी समाधान कोळी यांच्या शेताजवळ 75 वर्षीय वृद्धाचा मंगळवारी सकाळी मृतदेह आढळला. या प्रकरणी रूईखेडा वनरक्षक रुपाली नथ्थू वानखेडे यांनी मुक्ताईनगर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताची ओळख पटू शकली नाही. तपास एएसआय माणिक निकम करीत आहेत.