जळगाव- शहरातील रुस्तम शाळेच्या स्कूल बसने लहान बहिणीला स्कूल बसमध्ये बसवून घराकडे परतत असताना तरुणीला उडविल्याची घटना मंगळवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास मोहाडी फाट्याजवळ घडली. पलक अनिल कोरानी वय 16 असे जखमी मुलीचे नाव आहे. ती रुस्तमजी शाळेचीच दहावीची विद्यार्थीनी असून शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील बॉम्बे हॉटेलचे मालक अनिल गोर्वधनदास कोरानी यांची मुलगी आहे.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीवरुन कोरानी कुटुंबियांनी घटनास्थळ गाठले व पलकला खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिच्या डोक्याला तसेच कानाजवळ दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहे. माहिती मिळताच नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. अपघातानंतर स्कूलबसचा चालक बससोडून घटनास्थळाहून पसार झाला होता.