रेंजचा अभाव, सर्व्हर ठप्प ; स्वस्त धान्य दुकानदार त्रस्त

0

रावेर तालुक्यातील दुकानदारांनी मांडल्या तहसीलदारांकडे व्यथा

रावेर- स्वस्त धान्य वितरण करण्याची ई पॉस थंब मशीनला रेंज मिळत नसल्याने तसेच वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने तालुक्यातील त्रस्त झालेल्या स्वस्त धान्य दुकानदारांनी तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्याकडे शनिवारी कैफियत मांडली. जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी तहसीलदारांनी चर्चा करून समस्या सोडवण्याबाबत प्रसंगी आश्‍वासन दिले.

समस्या कायमची सोडवण्याची मागणी
सध्या रमजान महिना सुरू असून शासनाकडून स्वस्त धान्याचे वितरण सुरू आहे परंतु धान्य वितरणात तांत्रिक अडचणी वारंवार येत असल्याने ही समस्या कायमची सोडविण्याची मागणी स्वस्त धान्य दुकानदारांनी प्रसंगी केली. विलास चौधरी, विठ्ठल पाटील, मोहनलाल महाजन, किशोर पाटील, गोपाळ पाटील, काशीनाथ शिंदे, राहुल महाजन, नारायण लोणारी, दत्तू पाटील, रईस शेख आदी स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.