रेआल माद्रिद क्लब अंतिम फेरीत

0

अबुधाबी । मैदानात उतरल्यानंतर अवघ्या एका मिनिटात गॅरेथ बेलेने केलेल्या गोलामुळे रेआल माद्रिदने अल जझीराचा 2-1 असा पराभव करत क्लब विश्‍वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. बॅलेने 81 व्या मिनिटाला बदली खेळाडू मैदानात आला आणि आल्या आल्या त्याने गोल केला. या लढतीत माद्रिदला सुरुवातील सूर सापडला नाही. अल जझीरा संघाकडून ब्राझीलचा फॉरवर्ड रोमारिन्होने मध्यंतराच्या आधी गोल करत आघाडी मिळवली. पण दुसर्‍या हाफच्या सुरुवातीलाच ख्रिस्तीयानो रोनाल्डोने गोल करत माद्रिदला बरोबरी साधून दिली. शेवटची बॅलेचा गोल सामन्यात निर्णायक ठरला.

शनीवारी होणार्‍या अंतिम सामन्यात रेआल माद्रिदचा सामना द.अमेरिकेतील ब्राझीलीयन क्लब ग्रॅमियोशी होईल. ब्राझीलच्या या क्लबने जादा वेळेपर्यंत लांबलेल्या सामन्यात मेक्सिकोच्या पचुका संघाचा 1-0 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. या सामन्यात मागील चार वर्षांमधील तिसरे विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न रेआल माद्रिद करेल.