रेडक्रॉस स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न

0

जळगाव । जिल्ह्यातील गरजू रुग्णांना आवश्यक रक्त पुरवठा उपलब्ध होण्यासाठी रेडक्रॉस रक्तपेढी स्वयंपूर्ण व्हावी यावर आपण भर देत असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, अशा शब्दात जिल्हाधिकारी तथा जिल्हा रेडक्रॉसचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांनी जिल्हावासीयांना आश्वासन दिले. जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त आज शहरातील काव्य रत्नावली चौकात भाऊंचे उद्यान येथे व परिसरात सेवाकलाविष्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपर पोलीस अधिक्षक बच्चनसिंग, पोलीस उप अधिक्षक सांगळे, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, केशव स्मृतीप्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, रेडक्रॉस जळगावचे उपाध्यक्ष गनी मेमन, स्वामी रेणापूरकर आदी मान्यवर कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कलाविष्कार यावेळी सादर केली.

1 हजार फूट लांब कॅनव्हॉसवर चित्र
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कोर्‍या कॅन्व्हासवर रंगांची उधळण करुन सेवाकलाविष्कार या उपक्रमाचे उद्घाटन केले. त्यानंतर रक्तदानाचे महत्व सांगणार्‍या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी सेवाकलाविष्कार उपक्रमात जिल्ह्यातील 200 हून अधिक कलाशिक्षकांनी 1 हजार फूट लांब कॅनव्हॉसवर कलाकारांनी भव्य असे चित्र साकार केले होते. शहरात प्रथमच अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने जळगावकर नागरिक, कलाप्रेमी आणि रक्तदान चळवळीतील कार्यकर्त्यांन सह विविध शाळा महाविद्यालयातील विध्यार्थ्यानी आपला सहभाग नोंदविला.

बलून सोडून शांततेची प्रार्थना
उद्घाटक, चित्रकार सेवाकलाविष्कारचे चित्रकलाकार, चित्रकला विद्यार्थी व उपस्थित मान्यवर नागरिकांनी आकाशात बलून सोडून जगात शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रसन्न रेदासनी यांनी केले तर सूत्रसंचालन राजेश यावलकर असून. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद बियाणी, उज्ज्वला वर्मा, जैन स्पोर्टस चे फारुख शेख आदींनी परिश्रम घेतेले आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

कला शिक्षकांचा सहभाग
भव्य दिव्य सेवाकलाविष्कारा सह लहान मुलांसाठी रंगभरण स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा, कलाशिक्षकांनी सुचविल्या प्रमाणे पहिली ते आठवी पर्यंत दोन गटात रंगभरण स्पर्धा तर नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थी साठी घेण्यात आल्या. यावेळी प्रा.सचिन मुसळे, प्रा. निरंजन शेलार, शाम कुमावत, विकास मल्हारा, प्रा. तरुण भाटे सर, प्रा. आशीष जगताप, विजय जैन, राजू बावीस्कर, मनोज जंजाजळकर, मोघे सर, प्रेम कुमार सपकाळे, दाभाडे सर, पातेर सर, सुशील चौधरी, प्रदीप पवार, सुबोध सराफ, मिलिंद पाटील, योगेश सुतार, चौधरी सर आदी कलाशिक्षक उपस्थित होते.