रेडझोनमधील जागा खरेदी-विक्री पडणार महागात! 

0
पिंपरी चिंचवड : महापालिका क्षेत्रातील लष्कराच्या रेडझोनमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू आहेत. प्लॉटिंग करून जागा विकल्या जात आहे. बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. रेडझोन भागात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नयेत, फसवणूक होऊ शकते, असे आवाहन महापालिकेच्या बांधकाम परवाना आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने केले आहे.
भूखंडांची अनधिकृतपणे विक्री सुरु…
महापालिकेच्या हद्दीतील दिघी, वडमुखवाडी, तळवडे, मोशी परिसरात लष्कराचा रेडझोन आहे. लष्करी हद्दी लगतच्या भागात महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे जागांची खरेदी विक्री करीत आहेत. भूखंड घेऊन काही लोक त्यांची अनधिकृतपणे विक्री करीत आहेत. या भागात कच्चे रस्ते तयार करणे, भूखंडास वीट, तारेचे कंपाऊड करणे सुरू आहे. नागरिकांना जागरूक करण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाने परिपत्रक जाहीर केले आहे.
कोेट…
रेडझोनमधील भागाची बांधकाम परवानगी महापालिकेला देता येत नाही. मात्र, परवानगी नसलेले बांधकाम पाडण्याचा अधिकार महापालिकेला आहे. जागा खरेदी विक्री करताना नागरिकांनी बांधकाम परवाना विभागात शहनिशा करूनच व्यवहार करावेत. संरक्षण हद्दीतील भूखंडाचे उपविभागणी आणि मिळकतींची खरेदी विकी व्यवहार नोंदवून न घेण्याबाबत नोंदणी महानिरिक्षकांना कळविले आहे.         –  सतीश इंगळे, कार्यकारी अभियंता (अनधिकृत बांधकाम परवाना विभाग)