रेडझोन संस्थेचे सोमवारी आंदोलन

0

देहूरोड । देहूरोड अ‍ॅम्युनिशन डेपोमुळे कॅन्टोन्मेंट, देहू आणि किवळे, मामुर्डी भागात रेडझोन लागू करण्यात आला आहे. या रेडझोनची 2 हजार यार्डाची हद्द चुकीच्या पद्धतीने जाहीर करण्यात आली असून पुर्वीच्या अधिसूचनेनुसार ती एक हजार यार्ड करावी, अशी मागणी रेडझोन संघर्ष समिती अंतर्गत रेडझोन संस्था या नोंदणीकृत संघटनेकडून करण्यात आली आहे. संघटनेच्यावतीने यासंदर्भात सोमवारपासून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

रेडझोन संस्थेने यासंदर्भात दिलेल्या निवेदनामध्ये केंद्राच्या 2002 आणि 2003 मधील दोन वेगवेगळ्या अधिसूचनांचा संदर्भ दिला आहे. 19 डिसेंबर 2002 च्या अधिसूचनेनुसार संरक्षित रेडझोनची मर्यादा एक हजार यार्ड होती. तर 16 एप्रिल 2003 च्या अधिसूचनेनुसार ती 2 हजार यार्ड करण्यात आली. या हद्द वाढीला संस्थेचे विरोध असून मुळ अधिसूचनेप्रमाणे ही हद्द एक जार यार्ड करावी, अशी मागणी आहे.