रेल्वेखाली आल्याने एकाचा मृत्यू

0

भुसावळ– अप रेल्वे लाईनवर रेल्वेखाली आल्याने एकाचा मृत्यू झाला. दरम्यान ही आत्महत्या की रेल्वेतून पडल्याने हा मृत्यू झाला याबाबत तर्कवितर्क लढवला जात आहे. मयत व्यक्ती ही मुस्लीम समाजाची असून मंगळवारी ही घटना घडली. उंची 5.6, नाक सरळ, रंग गोरा, डोळे मध्यम, शरीर बांधा मजबूत, चेहरा लांबट तर अंगात काळ्या रंगाचे फुलबाहीचे जरकीन, पांढरा शर्ट, निळसर पांढरे ट्टे असलेला टी शर्ट, राखाडी रंगाची फुल पँट असे वर्णन आहे. ओळख पटत असल्यास लोहमार्ग पोलीस ठाण्याचे हवालदार आनंदा सरोदे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.