रेल्वेखाली पाय कापल्याच्या घटनेत तीन दिवस कोठडी

0

भुसावळ। येथील रेल्वे स्थानकाच्या आऊटर भागात पुष्षक एक्सप्रेस मधुन प्रवास करणार्‍या आमानच्या हातातील मोबाइल हिसकावणार्‍या आरोपीपासून मोबाईल वाचवितांना चालत्या गाडीतून तोल जाऊन पाय कापले गेल्याच्या घटनेतील आरोपी सोनू मोहन अवषरमल (वय 20, रा. महात्मा फुले नगर) याला पोलिस कोटडी संपल्याने 11 मार्च रोजी प्रथम वर्ग न्यायाधिश वराडे यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता पुन्हा 14 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

या घटनेतील आरोपी कृष्णा खरारे फरार आहे. सरकार तर्फे अ‍ॅड. नितीन खरे यांनी काम पाहिले.