रेल्वेखाली येवून प्रौढाचा मृत्यू

0

जळगाव । रेल्वेखाली आल्याने वाल्मीक नगरातील प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून राजू निंबा कोळी (सपकाळे) (वय-50) असे मयताचे नाव आहे. रविवारी दुपारी जिल्हा सामान्य रूग्णालयात त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात येवून मृतेदह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

राजु कोळी हे वाल्मीक नगरात कुटूंबियांसोबत राहत होते. तर आचारी काम करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचे. दरम्यान, रविवारी सकाळी त्यांचा रेल्वे खाली येवून मृत्यू झाल्याने त्यांचा मृतदेह आसोदा रेल्वे गेटजवळ काही अंतरावर रेल्वे रूळाजवळ मिळून आला. यानंतर राजु कोळी यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी करत मृत घोषित केले. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दुपारी कोळी यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी ताफलुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.