चिंचवड : रेल्वेरूळ ओलांडताना मालगाडीचे धडक बसून एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना चिंचवड रेल्वे स्थानकाजवळआज (सोमवारी) दुपारी तीनच्या सुमारास झाली. मनोज बसराज जंगले (वय 25 रा. आनंदनगर,चिंचवड) असे मृताचे नाव आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज हा आनंदनगरकडून संतोषनगरकडे रेल्वेरुळ ओलांडून जात असताना पुण्याकडे जाणार्या मालगाडीने मनोजला धडक दिली. यामध्ये मनोजचा जागीच मृत्यू झाला. मनोज हा मजूर होता. मिळेल ते काम करुन तो उदरनिर्वाह करत होता. काही दिवसांपासून त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरु होते असे मनोजच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.