भुसावळ : रेल्वेच्या भंगाराची चोरी करुन खरेदी-विक्री करणार्या तिघांविरुद्ध भुसावळ रेल्वे यार्ड आरपीएफ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भंगार दुकानदारास अटक करण्यात आली. संशयीतास रेल्वे न्यायालयात हजर केले असता त्यास 7 जूनपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधिशांनी दिले. आशिया महामार्ग क्र. 46 वरील सुर्यवंशी क्लिनीकच्या फलकाजवळ जाकीर (जग्गु) उस्मान खाटीक (रा. अंजुमन शाळेजवळ) याने नासीर उर्फ नस्या व कालू या दोघांकडून रेल्वेचे 81 किले 400 ग्रॅम वजनाचे 1 हजार 221 रुपये किंमतीचे भंगार साहित्य चोरुन खरेदी केले होते. वरीष्ठ विभागीय आयुक्त ए. पी. दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक डी.एच.पाटील, उपनिरीक्षक जी.एस.यादव, एएसआय देशराज सिंह, कॉन्स्टेबल मनोज सोनवणे व महेश सपकाळे यांच्या पथकाने सापळा रचून छापा टाकून भंगार साहित्य जप्त केले. यात दुकानमालक जाकीर उर्प जग्गु यास अटक करण्यात आली असून भुसावळ रेल्वे न्यायालयाने त्यास 7 जूनपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तपास उपनिरीक्षक घनशाम यादव हे करीत आहे.