नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाने खर्चात कपात करण्यासाठी रेल्वेच्या सर्व 17 विभागीय मंडळांना सुमारे 11 हजारे पदं संपुष्टात आणण्यास सांगितले आहे. रेल्वे मंडळाने सर्व विभागाच्या व्यवस्थापकांना हे पत्र पाठवले आहे. सध्या भारतीय रेल्वेत सुमारे 15 लाख कर्मचारी आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे रेल्वे कर्मचार्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
25 मे रोजी केंद्रीय रेल्वे मंडळाचे संचालक अमित सरण यांनी यासंदर्भातील पत्र सर्व विभागीय मुख्यालयांना पाठवले आहे. परंतु, रेल्वेने ही सामान्य बाब असल्याचे म्हटले आहे. अधिकार्यांच्या मते रेल्वे प्रत्येकवर्षी एक टक्के पदं संपुष्टात आणते. परंतु, या निर्णयावर स्पष्टीकरण देताना अधिकारी म्हणाले, कोणती पदे उपयोगाची नाहीत याची समीक्षा केली जाईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल.