भुसावळ- रेल्वेच्या कन्स्ट्रक्शन विभागात कनिष्ठ अभियंता असलेल्या 31 वर्षीय विवाहितेचा पाठलाग करून तिला जीवे ठार मारण्याची धमकी देणार्या परप्रांतीय आरोपीविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. विवाहितेच्या तक्रारीनुसार संशयीत आरोपी सुनीलकुमार शिवलाल शहा (रामपूर बारा, अलीनगर जि.जेहानाबाद, बिहार) याने 2 जुलै रोजी सकाळी 10 व सायंकाळी साडेसात वाजता यावल रोडवरील गुजराथी स्वीटमार्ट समोर पाठलाग करून विनयभंग केला तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तपास प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.