रेल्वेतून पडल्याने एकाचा मृत्यू

0

सावदा- सावदा-निंभोरा रेल्वे लाईनीदरम्यान कुठल्यातरी धावत्या गाडीतून पडल्याने 30 ते 35 वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी 10.35 वाजेपूर्वी ही घटना घडली. या प्रकरणी सावदा स्टेशन मास्तर अवधेशकुमार सिंग यांनी दिलेल्या खबरीनुसार सावदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. खांबा क्रमांक 461/06-08 दरम्यान अनोळखीचा मृतदेह आढळला. तपास हवालदार अशोक साळुंखे करीत आहेत.