रेल्वेतून पडल्याने एक जखमी

0

जळगाव : पथराड गावाजवळ धावत्या रेल्वतून पडल्याने एक इसम गंभीर जखमी झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी घडली. मोहम्मद गोलाम सन्दानी हजरत अली असे जखमी इसमाचे नाव आहे. दरम्यान, त्याची निवडणुक कार्डावरून पोलीसांना नाव कळले आहे.
सकाळी पाथराड गावाजवळ धावत्या रेल्वेतून गोलाम सन्दानी हे पडले. त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर इजा झाली. डोक्याला लागले असल्याने त्यांच्या डोक्यातून रक्त निघत होते. त्याच अवस्थेत ते रेल्वेरूळाजवळून पायी जात असतांना गावातील शेतकर्‍यांना दिसले. त्यांनी लागलीच पाळधी ऑऊटपोस्टचे पोलीस नाईक चंद्रकांत पाटील यांना जमखी अवस्थेत एक इसम असल्याची माहिती दिली. पाटील यांनी लागलीच घटनास्थळ गाठून मोहम्मद सन्दानी यांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. जमखमीच्या खिशातून आढळलेल्या निवडणुक कार्डाच्या आधावरून चंद्रकांत पाटील यांना जखमीचे नाव कळाले. प्राथमिक उपचाचार नंतर जखमीस जिल्हा रूग्णालयात अ‍ॅडमिट केले. परंतू दुपारी जखमी हा जिल्हा रुग्णालयातून कोठेतरी निघून गेला.