रेल्वेतून पडल्याने सांगलीच्या इसमाचा मृत्यू

0

भुसावळ– कुठल्या तरी धावत्या रेल्वेगाडीतून पडल्याने सोलापूरच्या इसमाचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास एचडीएफसी बँकेच्या पाठीमागील मुख्य अप रेल्वे लाईनवर ही घटना घडली. मयताच्या खिशात तानाजी शंकर पवार (33, सांगली) नावाचे आधारकार्ड मिळाले आहे. त्यावरून लोहमार्ग पोलिसांनी संबंधिताच्या कुटुंबियांशी संपर्क केला असून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मृतदेह जळगाव सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. ऑन ड्युटी डीवायएसएस यांनी खबर दिल्यावरून लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार संजीवनी तारगे करीत आहेत.