चिंचवड :- तेरा वर्षीय मुलाचा इंद्रायणी एक्सप्रेसच्या दारातून तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाला. अर्जुन कृष्णा रमेशराव (वय-13, रा.डोंबिवली वेस्ट, मुंबई) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. तो मामाच्या गावी जाण्यासाठी मामासोबत निघाला होता. हि घटना बुधवारी सकाळच्या सुमारास चिंचवड स्थानकावर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन हा मामासोबत इंद्रायणी एक्सप्रेसने सोलापूरच्या दिशेने जात होता. रेल्वे चिंचवड स्थानकाजवळ येताच तो रेल्वेच्या दारातून तोल जाऊन खाली कोसळला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. लोहमार्ग पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, पिंपरी रेल्वे स्थानकावर आजच सकाळी लोहमार्ग ओलांडत असताना रेल्वे गाडीची धडक बसल्याने 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.