जळगाव। जळगाव ते भुसावळ दरम्यान मंगळवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास वृद्ध महिला रेल्वेतून खाली पडली. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.
मध्यप्रदेश राज्यातील उज्जैन येथील स्वागता नरेंद्र सुपे (वय-63) या रेल्वेने प्रवास करीत होत्या. जळगाव ते भुसावळ दरम्यान त्यांचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.