रेल्वेत चढतांना तोल गेल्याने प्रौढ गंभीर जखमी

0

नगरदेवळा – नगरदेवळ्याहून जळगावला येण्यासाठी 50 वर्षीय प्रौढ रेल्वेत चढत असतांना तोल गेल्याने दोन्ही पाय रेल्वेखाली आल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास नगरदेवळा रेल्वे स्थानकावर घडली असून पुढील उपचारार्थ 108 ने जळगावला रवाना करण्यात आले आहे. प्रतिनिधींकडून मिळालेली माहिती अशी की, राजेंद्र जगन्नाथ शिरूडे-वाणी (वय-50) रा. नगरदेवळा ता.पाचोरा ह.मु.रिंगरोड जळगाव यांचे नगरदेवळा येथे शेती आहे. गेल्या काही वर्षांपासून ते जळगावलाच स्थायीक झाले होते. त्यांची शेती असल्याने ते दररोज जळगाव ते नगरदेवळा असा प्रवास रेल्वे शटलने प्रवास करतात. रविवार सायंकाळी मुंबई-भुसावळ पॅसेंजर सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास आले. त्यावेळी इतर प्रवाश्यांसोबत राजेंद्र शिरूडे रेल्वेत चढत असतांना त्यांचा तोल गेल्याने त्यांचे दोन्ही पाय रेल्वे खाली आल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांचा चुलत भाऊ प्रमोद काशिनाथ शिरूडे यांच्यासह इतर नातेवाईंकांनी पुढील उपचारासाठी जळगाव येथे 108 ने रवाना करण्यात आले आहे.