नवी दिल्ली – केंद्रीय रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून गेल्या एप्रिल ते मे महिन्यादरम्यान विक्रमी कमाई केली आहे. या काळात, रेल्वेने विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल ४२.१५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या काळात, विनातिकिट वा अनियमित प्रवास करणारी आणि सामानाची बुकिंग न केलेले एकूण ७.५९ लाख प्रकरणे आढळून आली. गेल्या वर्षी याच काळात ७.२५ प्रकरणे आढळून आली होती. यात ४.७० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे रेल्वेने एका पत्रकात म्हटले आहे.
गेल्या वर्षी एप्रिल ते मे महिन्यादरम्यान रेल्वेची कमाई ४१.२२ कोटी झाली होती. तर याव वर्षी, याच कालावधीत त्यात २.२५ टक्क्यांनी वाढ होऊन, ती ४२.१५ कोटी झीली आहे.