जळगाव। नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळील वडगाव खुर्द ते बाळद दरम्यान खांबा क्रमांक 355जवळ अज्ञात व्यक्तीने पहाटे तीन ते चार वाजेदरम्यान रेल्वे रुळावर मोठे दगड ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यावेळी येणार्या इगतपुरी- भुसावळ एक्सप्रेसच्या संरक्षक पिंजर्याला धडकून दगडाचे तुकडे तुकडे झाले. रेल्वे गाडीचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.
मालगाडीचे इंजिन लावून पाठविली
अमळनेरहून आलेल्या वृत्तानुसार चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्स्प्रेसच्या इंजिनवर पाडसे (ता. अमळनेर) रेल्वे स्थानकाजवळ विद्युत खांब पडल्याने दोन तास एक्स्प्रेस रोखण्यात आली. भुसावळ-सुरत रेल्वेलाईन एकमार्गी असल्याने वाहतुकीला दोन तास खोळंबा झाला. एक्स्प्रेसच्या इंजिनमध्येही बिघाड झाल्याने मालगाडीचे इंजिन लावण्यात आले व नवजीवन एक्स्प्रेस मार्गस्थ झाली. चालकाच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली. दगडाच्या धडकेने इगतपुरी- भुसावळ एक्सप्रेसच्या व्हॅक्युम नळीला बाधा होऊन घटनास्थळावर बराच वेळ गाडी थांबवून होती. बिघाड काढून गाडी रवाना करण्यात आली. रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी, रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहचले. यामध्ये काही घातपातचा प्रकार तर नसावा अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली.
चालकाचे प्रसंगावधान
पाडसेजवळ दुहेरीकरण सुरू असलेल्या बाजूच्या रूळावर पोल टाकण्याचे काम सुरू आहे. सकाळी नवजीवन एक्स्प्रेसचा क्रॉसिंगमुळे वेग कमी होता. मात्र, विद्युत पोल इंजिनवर कोसळला. चालकाने प्रसंगावधान राखून एक्स्प्रेस रोखल्याने दुर्घटना टळली. मात्र, इंजिनमध्ये बिघाड झाला. ऊन, लग्नसराईने प्रवाशांचे हाल झाले. पाडसे स्थानकावर पाण्याची सोय नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली.