जळगाव । नंदुरबार येथील लसनाचे व्यापारी बुधवारी जोशीपेठेत साडूच्या मुलीच्या लग्नासाठी आले होते. गुरूवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास बळीरामपेेठेतील साईबाबा मंदिराजवळ रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाला मात्र ते चुकीच्या रेल्वेत बसल्याने घाई घाईने उतरताना अपघात झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तर रेल्वे समोर उडी मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे काय घडले ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. नंदुरबार येथील लसनाचे व्यापारी इस्राईल मोहंमद युसूफ बागवान (वय-45) यांच्या साडुच्या मुलीचे बुधवारी जोशीपेठेत लग्न होते. त्यासाठी बागवान कुटुंबियांसह आलेले होते.तर गुरूवारी काम असल्याने त्यांना नंदुरबार येथे परत जायचे होते. त्यामुळे सकाळी 7 वाजता ते घरातून निघाले. सुरत पॅसेंजरने ते नंदुरबार येथेजाणार होते.
लोहमार्ग पोलिसात नोंद
रेल्वे स्थानकावर गेल्यानंतर बागवान हे चुकून भुसावळकडे जाणार्या रेल्वेत बसले. मात्र काही वेळानंतर त्यांच्या लक्षात आल्यावर ते घाई घाईने खाली उतरत असताना धावत्या रेल्वेतून खाली पडले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान, गुरूवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास रेल्वे समोर एका प्रौढाने उडी घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर लोकोपायलटने दिलेल्या खबरीवरून लोहमार्ग पोलिसांत या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे.