रेल्वे अभियंत्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सावखेडा खुर्दमध्ये हळहळ

0

रावेर- तालुक्यातील सावखेडा खुर्द येथील मूळ रहिवासी तथा माटुंगा येथे रेल्वेत अभियंता असलेल्या रोहण श्रीराम महाजन (वय 35) यांचा लोणावळा येथे दरीत कोसळून 19 ऑगस्टला मृत्यू झाल्याने गावात ही वार्ता कळताच हळहळ व्यक्त करण्यात आली. अभियंता महाजन हे भिवंडी (ता.पडघा) येथे वास्तव्यास होते. 19 ऑगस्टला रविवारची सुटी असल्याने ते सहा सहकार्‍यांसोबत लोणावळा येथे वर्षा विहारास गेले होते. तेथील नागफणी पॉइंटवर दाट धुक्यामुळे रोहण महाजन यांना दरीचा अंदाज न आल्याने तोल जावून दुपारी 4.30 वाजता दरीत कोसळले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. लोणावळा येथील शिवदुर्गा बचाव पथकाने रोहणचा मृतदेह खोल दरीतून बाहेर काढला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी असा परीवार आहे.