भुसावळ : लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचे आरक्षण कार्यालय बंद करण्यात आले होते आणि आता रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार आरक्षण कार्यालय 22 मे पासून भुसावळ मंडळातील आरक्षण कार्यालय आपल्या वेळेनुसार सुरू झाले आहे तर आरक्षण तिकीट रद्द करण्याची प्रक्रियाही सोमवार, 25 पासून सुरू होत आहे. आरक्षण धारकांनी ारक्षण तिकीट हे रद्द करण्यासाठी घाई न करता व आरोग्याचा धोका लक्षात घेता व ज्या प्रवाशांच्या गाड्या रद्द झाल्या आहेत त्या प्रवाशांचा आरक्षण तिकिटाचा परतावा हा सहा महिन्याच्या मुदतीपर्यंत दिला जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. तिकीट धारकांनी रेल्वे आरक्षण केंद्रावर येताना मास्क लावूनच यावे तसेच सोशल डिस्टन्सींग पाळून रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.