रेल्वे क्रॉसींगजवळ एकाची गळफास

0

अमळनेर – अमळनेर-धरणगाव रस्त्यावरील टाकरखेडा रेल्वे क्रॉसिंग जवळ 29 डिसेंबर रोजी रात्री एका अनोळखी इसमाने बाभूळाच्या झाडास नॉयलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मयत 30 वर्षीय असून अंगात लाल निळसर कलरचे चौकटी शर्ट तर काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला होता. कुर्‍हे बुद्रुकचे पोलिस पाटील भरतसिंग पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोकॉ प्रशांत वाडीले हे करीत आहेत.