रेल्वे तिकीटांचा काळाबाजार ; अमरावतीतील दोघा संशयीतांना अटक

0

रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई ; दलालांच्या गोटात खळबळ

भुसावळ- रेल्वे तिकीटांची काळ्या बाजारात विक्री करणार्‍या अमरातीतील दोघांच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या विशेष पथकाने मुसक्या आवळल्या. आरोपींच्या ताब्यातून 28 हजार 750 रुपये किमतीची 13 ई तिकीटे, संगणक तसेच प्रिंटर जप्त करण्यात आले. भुसावळ विभागात आतापर्यंत झालेली ही चौथी कारवाई असल्याचे वरीष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त अजय प्रकाश दुबे म्हणाले. आमीर मुर्तजा काझी व शरद कांतीलाल गांधी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

यांनी केली कारवाई
विशेष पथकाचे निरीक्षक प्रवीणकुमार कस्बे, उपनिरीक्षक अंबिका यादव, उपनिरीक्षक समाधान वाहुळकर, संजीव राय, मुख्य आरक्षक मिलींद तायडे, आरक्षक मनिष शर्मा, विनोद जेठवे, योगेश पाटील यांच्या पथकाने गुप्त माहितीवरुन 6 रोजी अमरावती शहरातील जयस्तंभ चौक राका मॉलमधील बीना ट्रॅव्हल्स अ‍ॅण्ड ट्रीप तसेच गांधी साईबर कॅफे दुकानावर धाड टाकून 28 हजार 750 रुपये किमतीच्या 13 अवैध ई तिकीटांसह 19 हजार 700 रुपये रोख जप्त करण्यात आली. या प्रकरणी आमीर मुर्तजा काझी (44, रा.बडगाव रोड, अमरावती) तसेच गांधी सायबर कॅफेचे मालक शरद कांतीलाल गांधी (45, रा.रीया प्लाझा, अमरावती) यांना अटक करण्यात आली. दरम्यान, जानेवारी ते जून 2018 या वर्षभरात एकूण 9 कारवायांमध्ये 22 अवैध दलालांना अटक करण्यात आली.