रेल्वे तिकीटावर मोदींचा फोटो असल्याप्रकरणी रेल्वेचे दोन कर्मचारी निलंबीत !

0

नवी दिल्ली – देशभरात लोकसभा निवडणूकीमुळे आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेच्या काळात राजकीय जाहिरातबाजी होऊ नये यासाठी निवडणूक आयोग विशेष लक्ष ठेवून असते. दरम्यान आचारंसहितेच्या काळात रेल्वे तिकीटावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो दिसून आल्याने आचारसंहितेचा भंगची तक्रारी येत होत्या. या संदर्भात निवडणूक आयोगाने दखल घेतल्यामुळे रेल्वे मंत्रालयाने मोदींचा फोटो असलेले तिकीट परत मागविले होते. त्यानंतर आता रेल्वे विभागाकडून प्रवाशांना मोदींचे फोटा असलेले तिकीट वाटणार्‍या दोन कर्मचार्‍यांना निलंबीत करण्यात आले आहे. तसेच त्यांची चौकशीही करण्यात येणार आहे.

https://janshakti.online/new/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87/

बारबंकी येथील रेल्वे प्रशासनाकडूनही हे तिकीट नजरचुकीने देण्यात आल्याचे म्हटले आहे. 13 एप्रिल रोजी जेव्हा संबंधित कर्मचार्‍याची शिफ्ट चेंज झाली, पण जुनाच रोल वापरात आला होता. तरीही, याप्रकरणी दोन कर्मचार्‍यांना निलंबित केले असून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने आचारसंहितेचा भंग केल्याचे समोर आले होते. निवडणूक आयोगाकडून प्रचारात भारतीय सैन्याचा उल्लेख करू नका, असे सांगितले होते. तरीही, पंतप्रधान मोदींनी सैन्याच्या नावावर मत मागत आहे, तर रेल्वे प्रशासन आचार संहितेचा भंग करत मोदींचा फोटो असलेले तिकीट प्रवाशांना दिले जात आहे.