रेल्वे प्रवाशांची गैरसोय ; अप-डाऊन भुसावळ-देवळाली पॅसेंजर महिनाभर रद्द

0

भुसावळ- अप 51182 भुसावळ ते देवळाली पॅसेंजर 22 जून ते 20 जुलै तसेच डाऊन 51181 देवळाली ते भुसावळ पॅसेंजर 23 जून ते 20 जुलैपर्यंत रेल्वे प्रशासनातर्फे रद्द करण्यात आली आहे. तब्बल महिनाभर पॅसेंजर बंद करण्यात आल्याने खान्देशातील रेल्वे प्रवाशांचे विशेषतः मोठे हाल होणार आहेत. भुसावळ विभागातील भुसावळसह भादली, जळगाव या सेक्शनमधील रेल्वे रूळाखालील गिट्टीत माती अडकल्याने ती काढून नव्याने गिट्टी टाकण्याचे (बीसीएम) काम करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने महिनाभर गाडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घेवून गैरसोय टाळावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.