अमळनेर । तालुक्यातील बाह्मणे रेल्वे गेट ते पाडसे स्टेशन पर्यंतची सुमारे 150 ते 200 एकर शेती पावसाच्या पाण्याखाली गेल्याने शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या 8 महिन्यापूर्वी कृउबा संचालक भिकेश पाटील यांनी रेल्वे प्रशासनास निवेदन दिले होते. मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. बाह्मणे रेल्वेगेट ते पाडसे स्टेशन दरम्यान शेतीतील पाणी निचरा करण्यासाठी गटार करण्या संदर्भात पश्चिम रेल्वेच्या अधिकार्यांना निवेदन दिले होते, परंतु प्रशासनाने त्याची आज पावतो दखल घेतली नाही व रेल्वे कंत्राटदाराने गटार चारीचे कामकाज केले नाही म्हणून 7 जून रोजी झालेल्या पहिल्याच पावसामुळे परिसरातील 150 ते 200 एकर कपाशी लागवड केलेली शेती पाण्याखाली आली असून प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांना रेल्वे प्रशासनाकडून त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.
भायुमोतर्फे नुकसान भरपाईची मागणी
रेल्वे प्रशासनाने जर दुर्लक्ष केले नसते तर रेल्वे रुळा शेजारील सुमारे 150 ते 200 एकर जमीन पाण्याखाली जावून शेतीचे नुकसान झाले नसते, त्यामुळे शेतकर्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानास पूर्णतः रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप अमळनेर तालुका भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष भिकेश पाटील यांचा माध्यमातून 7 सप्टेबर 2016 रोजी बाह्मणे रेल्वेगेट ते पाडसे स्टेशन दरम्यान शेतीतील पाणी निचरा करण्यासाठी गटार करण्यासंदर्भात पश्चिम रेल्वेचा अधिकार्यांनानिवेदन दिले होते.
या शेतकर्यांचे झाले नुकसान
रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निवेदनाची कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही आणि आर्थिक संकटाला समोरे जावे लागले असून यानुकसान भरपाईची मागणी निवेदनाद्वारे केली असून यात 7 रोजी झालेल्या पावसामुळे पावभा पाटील, धर्मराज पाटील, चंद्रकांत पाटील, सुनील पाटील, युवराज पाटील, भिकन पाटील, महेश पाटील, राजेंद्र पाटील, शांताराम पाटील, ललित पाटील, राजू भिल यांच्यासह इतर शेतकर्यांची शेती पाण्याखाली येवून मोठे नुकसान झाले आहे.
दुष्काळात तेरावा महिना असल्याची गत
पश्चिम रेल्वे मार्गावरील गेट न 126 बाह्मणे रेल्वे गेट पाडसे स्टेशनपर्यंतच्या रेल्वे रुळाला लागून संपूर्ण शेतात ह्या हंगामात पीक पेरा झाला असून विविध शेतात कपसाची लागवड केली. रेल्वेच्या दुहेरीकरणाच्या कामामुळे पांझरा पुलाच्या आगोदर नवीन रेल्वे लाईन ही पीक पेरा करण्यायोग्य शेताला लागून भराव करून टाकलेली असल्यामुळे एकप्रकारे बांध बांधला गेल्याने शेतात पाणी जमा होऊन शेतकर्याचे मोठे नुकसान झाले आहे. कृउबा संचालक भिकेश पाटील यांनी 7 सप्टेंबर 2016 रोजी पश्चिम रेल्वेच्या अधिकार्यांना निवेदन देवून रेल्वे रुळाजवळ नवीन गटार तयार करण्याची मागणी केली होती. परंतु 8 महिने होऊन देखील रेल्वे प्रशासनाने ह्याकडे दुर्लक्ष केले.