रेल्वे प्रशासनातर्फे भुसावळ विभागात स्वच्छता मोहिम

0

भुसावळ । मध्य रेल्वेच्या भुसावळ विभातर्फे स्वच्छता पंधरवाडा आयोजित केला असून त्या अंतर्गत 17 रोजी विभागातील रेल्वे स्थानक व परिसरात स्वच्छता करण्यात येऊन प्रवाशांशी संवाद साधण्यात आला. विभागातील अमरावती स्थानकात डॉ.मुरके गृप व चाळीसगाव स्थानकात संत चॅरिटेबल ट्रस्ट या अशासकिय संस्थांव्दारे स्थानकावर स्वच्छता करण्यात आली.

रोटरीसह विविध सामाजिक संस्थांनी नोंदविला सहभाग
भुसावळ रेल्वे स्थानकावर रोटरी क्लबतर्फे तर नाशिक, चाळीसगाव, बडनेरा, बर्‍हाणपूर, अमरावती, धुळे, मलकापूर, अमरावती, अकोला, निफाड, पाचोरा, खंडवा आदी स्थानकांवर रेल्वे कर्मचार्‍यांनी प्रवाशांशी स्वच्छतेवर संवाद साधून संदेश दिला. मध्य रेल्वेच्या स्काऊट -गाईडतर्फे मनमाड, अकोला, बडनेरा, अमरावती, खंडवा, बर्‍हाणपूर या स्थानकांवर पथनाट्य सादर करून स्वच्छतेचा संदेश दिला. अकोला रेल्वे स्थानकावर शिवाजी विद्यालयातर्फे रॅली काढण्यात आली तर पाचोर्‍यात बुरहानी इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयाकडून पथनाट्य सादर करण्यात आले.