रेल्वे प्लाटफॉर्मवरील वाय फाय सेवा…

0

नवी दिल्ली । भारतातील 400 रेल्वे प्लाटफॉर्मवर दिल्या जाणार्याव फ्री वाय-फाय सेवेची गुणवत्ता लंडन आणि सॅन फ्रान्सिस्को येथील सेवेपेक्षाही सरस दर्जाची असल्याचे प्रमाणपत्र ’गुगल’ने दिले आहे. ’गुगल’चे भारतप्रमुख गुलझार आझाद यांनी एका मुलाखतीत हे सांगितले.

अनेक अप्स रेल्वे प्रवाशांना वापरता येतात आणि सर्फिंगही करता येते, असे रेलटेल कंपनी म्हणते. सार्वजनिक उद्योगांतर्गत येणारी ही कंपनी रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारित आहे. ती रेलवायर ही वायफाय सेवा पुरवते. ’गुगल’च्या सहकार्याने आतापर्यंत 400 स्टेशनवर ही सेवा परीणामकारपणे पुरविली जात आहे. 2017 अखेरीस 200 स्टेशनवर वायफाय उलब्ध होईल. त्यानंतर 2018 मध्येही तितक्याच स्टेशनवर वायफाय देण्याचे रेलटेल आणि ’गुगल’चे उद्दीष्ट आहे.