रेल्वे मालधक्क्याजवळून हमालाची दुचाकी लांबविली

जळगाव : शहरातील रेल्वे मालधक्का येथून हमाली काम करणार्‍या तरुणाची 30 हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविली. याप्रकरणी बुधवार, 22 जून रोजी दुपारी दोन वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरात दुचाकी चोरींचे सत्र कायम
करण शिवप्रसाद ओसवाल (38, रा.भूरे मामलेदार, शिवाजी नगर, जळगाव) हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रेल्वे मालधक्क्यावर हमालीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. सोमवार, 20 जून रोजी दुपारी दोन वाजता करण ओसवाल हा दुचाकी (एम.पी. 47 एम.एल.3150) ने रेल्वे मालधक्क्यावर आला व शेडजवळ त्याने दुचाकी पार्क केली मात्र चोरट्यांनी संधी साधत 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी बुधवारी दुपारी दोन वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील करीत आहे.