भुसावळ- रेल्वे यार्डात खांबा क्रमांक 448/11-13 जवळ 25 वर्षीय अनोळखीचा मृत्यू झाल्याची घटना 4 रोजी घडली. उंची 5.5, रंग गोरा, शरीर बांधा मध्यम, उजव्या हातावर ओम गोंदलेले व डाव्या हातावर के गीता लिहिले असून अंगात लाल रंगाचे जॅकेट, काळी पँट व आकाश फुलबाहीचा शर्ट आहे. कुठल्या धावत्या रेल्वेतून पडल्याने वा आल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. तपास लोहमार्गच्या एएसआय अरुणा कोहरे करीत आहेत.