रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले : पाचोरा-जामनेर मार्गाच्या विस्तारीकरणासाठी केंद्राकडून 955 कोटी मंजूर

Pachora-Jamner route will be broad gauge: 955 crore approved by the Centre : Minister of State for Railways Raosaheb Danve जामनेर : रेल्वे अर्थसंकल्पात राज्याला यावेळी सर्वाधिक 11 हजार कोटी रुपये मिळाले असून जालना ते जळगाव या 174 किलोमीटर अंतराच्या नवीन रेल्वे मार्गासाठी डीपीआर मंजूर झाला असून पाचोरा ते जामनेर (पीजे) ब्रॉडगेज व बोदवडपर्यंतच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने 955 कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी जामनेर येथे दिली. आहेत. हा संपूर्ण निधी केंद्र सरकार देणार असल्याचेही ते म्हणाले. जामनेर येथे रविवारी दुपारी पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पॅसेंजर चालवणे सर्वाधिक तोट्याचे काम
दानवे म्हणाले की, रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर सर्वाधिक कामे राज्यात केली असून विमानतळांसारखी चकचकीच रेल्वे स्थानक करावयाची आहेत. खान्देशातून पुण्यासाठी नवीन गाडी सुरू करण्याची मागणी काही जणांनी केली असलीतरी पॅसेंजर गाडी चालविणे हे सर्वात तोट्याचे काम आहे. जालना-जळगाव नवीन मार्गामुळे खान्देश हा दक्षिण भारताशी जोडला जाणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व नगराध्यक्ष साधना महाजन यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार संजय सावकरे, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्ष साधना महाजन, माजी आमदार स्मिता वाघ आदींवी उपस्थित होती.