रेल्वे रूळावर वृक्ष उन्मळला, अप लाईनवर तीन गाड्या लेट

भुसावळ : गाळणजवळील अप लाईनीवर वादळी वार्‍यासह सुरू असलेल्या पावसामुळे वृक्ष उन्मळल्याने तीन रेल्वे गाड्या उशिराने धावल्या तर रेल्वे चालकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे अप्रिय घटनाही घडली. पाचोरा तालुक्यातील गाळण रेल्वे स्थानकाजवळ अप लाईनीवर मोठा वृक्ष उन्मळून पडल्याची घटना गुरूवारी दुपारी 4.50 वाजता घडली. एका तासात पडलेला वृक्ष हटवण्यात आला मात्र त्याचा फटका अप मार्गावरील रेल्वे गाड्यांना फटका बसला. या मार्गावरील रेल्वे गाड्या सेक्शनमध्ये थांबविण्यात आल्या. अप लाईनवरील गीतांजली एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस व तुलसी एक्स्प्रेस या तीन गाड्या सेक्शनमध्येच थांबविण्यात आल्या. यावेळी या रेल्वे लाईनीवरील गँगमन आणि गाडीतून उतरलेल्या प्रवाशांनी मिळून रेल्वे लाईनीवर पडलेले झाड सायंकाळी 5.45 वाजता रेल्वे लाईनीवरून हटविले. त्यानंतर गाड्या पुढे सुरळीत झाल्यात. जळगाव आरपीएफ कार्यालयात नोंद करण्यात आली.