अन्यायकारक निर्णयाविरोधात उपसले आंदोलनाचे हत्यार
भुसावळ- रेल्वे विभागाच्या लोको पायलट कर्मचार्यांनी सातव्या वेतन आयोगाच्या देयक असलेल्या रकमेची घोषणा करण्यास रेल्वे प्रशासन विलंब करीत असल्याच्या कारणावरून तीन दिवसीय उपवास आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात ऑल इंडीया लोको रनिंग स्टाफ असोसिएशनचे कर्मचारी सहभागी झाले आहेत.
17 ते 19 जुलै दरम्यान आंदोलन
ऑल इंडीया लोको रनिंग स्टाफ असोसिएशनचे कर्मचार्यांनी रेल्वे सेवेवर विपरीत परीणाम न होता आपापल्या विभागात विविध प्रलंबीत मागण्यासाठी 17 ते 19 जुलै असे तिन दिवसीय उपवास आंदोलन सुरू केले आहे. लोको पायलट असोसिएशनने सातव्या वेतन आयोगाच्या भत्याचा अहवाल 1 जुलै 2017 पासून लागु केली आहे. यामध्ये टीए ची संशोधीत दर लोको पायलटच्या समान असलेल्या दुसर्या कर्मचार्यांना 1 जानेवारी 2017 पासून घोषीत करण्यात आला मात्र रेल्वे प्रशासन लोको पायलटच्या रनिंग भत्याचा दर संशोधन करण्यास विलंब करीत असल्याने लोको पायलट कर्मचार्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे .यासाठी लोको पायलट असोसिएशनने अनेक वेळा धरणे आंदोलन केले आहे मात्र रेल्वे प्रशासनाने अद्यापही दखल घेतली नाही. यामुळे ऑल इंडीया लोको रनिंग स्टाफ असोसिएशनने 17 ते 19 जुलै असे तीन दिवस उपवास आंदोलन सुरू केले आहे.
अशा आहेत मागण्या
ऑल इंडीया लोको रनिंग स्टाफ असोसिएशनने पुकारलेेल्या उपवास आंदोलनात रनिंग भत्त्याचा आरएसी 1980 च्या अनुसार त्वरीत निर्णय घेणे, आरबीई 13/2018 च्या विसंगत आदेशात व्याप्त लोको रनिंग स्टाफ सेवानिवृत्तधारकांच्या वेतनातील असमानता दुर करून त्याच्यात सुधारणा करणे अशा मागण्या केल्या आहेत.
रेल्वे सेवेवर परीणाम नाही
ऑल इंडीया लोको रनिंग स्टाफ असोसिएशनच्या लोको पायलट कर्मचार्यांनी रेल्वे सेवेवर कुठल्याही विपरीत होणार नाही याची दक्षता घेत ऑन ड्युटी व ऑफ ड्युटीवरील कर्मचार्यांनी उपवास आंदोलनात सहभाग घेतला आहे. यामुळे रेल्वे सेवेवर कुठलाही परीणाम झालेला नाही.