भुसावळ- भुसावळ रेल्वे विभाग विकासाच्या ट्रॅकवर धावण्याचे श्रेय हे सर्व अधिकार्यांसह कर्मचार्यांचेच आहे. प्रत्येक कर्मचार्याने मन लावून कामे केल्यास रेल्वेचा आणखीन झपाट्याने विकास होईल, असा आशावाद भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के. यादव यांनी येथे व्यक्त केला. रेल्वेच्या 63 व्या सप्ताहाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. रेल्वेच्या श्रीकृष्णचंद्र सभागृहात मंगळवारी दुपारी तीन वाजता 570 रेल्वे कर्मचार्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल मेडल व प्रमाणपत्र देऊन डीआरएम यांनी सन्मानीत केले.
डीआरएम यादव म्हणाले की, रेल्वेचा विकास करणे हे रेल्वे कर्मचार्यांच्या हातात आहे. टीमवर्क असल्यास विकास झपाट्याने होत असतो. भुसावळ स्थानक व विभाग ज्या विकासाच्या ट्रॅकवर धावत आहे, त्याचे श्रेय हे अधिकारी व कर्मचार्यांना जाते. यावेळी डीआरएम यादव, एडीआरएम मनोज सिन्हा, वरिष्ठ कार्मीक अधिकारी डॉ. तुशाबा शिंदे आदींचा सत्कार करण्यात आला. डीआरएम यादव यांनी सांगितले की, आधुनिक काळात रेल्वेत मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहे, आधुनिकतेकडे रेल्वेची वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे आपणास प्रत्येक कर्मचार्यांना सुध्दा कामात बदल करणे अपेक्षित आहे. रेल्वेच्या विकास करायचा असल्याने तो टिमवर्ककडूनच होत असतो. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वरीष्ठ कार्मिक अधिकारी डॉ. तुशाबा शिंदे यांनी आभार मानले.