रेल्वे वॉरंटमधील आरोपी भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ : रेल्वे वॉरंटमधील आरोपी भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. राजेश नारायण सोळंके (रा.नालेगंज झोपडपट्टी, चिंचाळा, बर्‍हाणपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, भुसावळ लोहमार्गचे पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल खोडके, हवालदार पांडुरंग वसु आदींनी केली.