रेल्वे स्टेशन परिसरात अतिक्रमण; परिस्थिती जैसे थे

0

जळगाव । शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या रेल्वे स्थानक परिसरात पोलीस बंदोबस्तात अतिक्रण विभागाने कार्यवाही केल्यावर देखील पुन्हा अतिक्रमण धारकांनी आधी पेक्षा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले असून महापालिका, पोलीस विभागाला अतिक्रमण धारकांनी खो दाखविला आहे. महिन्याभरा पूर्वीच अतिक्रमण धारकांवर कार्यवाही करण्यात आली होती परिस्थिती जैसे थे झाली आहे. मनपा अतिक्रमणधारकांवर काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.

वाहतुकीचे होते कोंडी
महिन्याभरा पूर्वी रेल्वे स्थानकावर ना. गिरीश महाजन यांचे वाहने वाहतुकीच्या कोंडीत अडकले होते. त्याच वेळी रेल्वे स्थानक परिसरात मोठा वाद निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांना तात्काळ पाचारण करण्यात आले होते एकूण 16 जनावर कार्यवाही पोलिसा कडून करण्यात आल्याने अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले होते. आता सुद्धा याठिकाणी वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून प्रवाशी बेहाल झाले आहे.

आंदोलनाचा पवित्रा
रेल्वे परिसरात अधिक संख्येत रस्त्यावर खाद्य पदार्थ विकले जातात. दिवस रात्र याठिकाणी नागरिकांची रेलचेल असते. महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात अतिक्रमण मोहीम राबवली आहे. शहराच्या विविध वर्दळीच्या भागात अतिक्रमण विभागाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. कामगार संघटनेकडून गेल्या काळात आंदोलने करण्यात आलेली आहे. मात्र आता पुन्हा रोजगाराचा प्रश्न भेडसावत असल्याने कामगार युनियन कडून पुन्हा शहरात आंदोलने करण्यात येणार असल्याची माहिती कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी दिली आहे.