रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीमुळे चोरटा जेरबंद

0

भुसावळ। रेल्वे प्रवाशाचे 22 हजार रुपयाचा मोबाईल चोरी करताना सीसीटीव्हीवर आढळून आलेल्या चोरट्यास रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचार्‍यांनी अटक केली. नाशिक येथील रहिवासी मिथुन पांडूरंग गोंदणे हे शनिवार 13 रोजी हुतात्मा एक्सप्रेसने प्रवास करीत असताना आरोपी रोहित बाळासाहेब जाधव (वय 17, रा. सोनवडी, निफाड) याने गोंदणे यांचे 22 हजार रुपये लंपास करीत असताना सीसीटीव्हीवरील चित्रीकरणामुळे हि चोरी उघडकीस आली. याबाबत रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचार्‍यांनी आरोपीस अटक केली आहे.

कर्मचार्‍यांची सतर्कता
रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक जुबेर पठाण यांना या प्रकरणाबद्दल सीसीटीव्ही कंट्रोल रुममधील कर्मचार्‍यांने माहिती देऊन पठाण यांच्या आदेशान्वये या चोरट्यास अटक करण्यात आली आहे. याप्रसंगी उपनिरीक्षक संजय गांगुर्डे यांची उपस्थिती होती. या चोरट्याकडून संपुर्ण माहिती घेतल्यानंतर त्याने चोरलेला मोबाईल परत केला. रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे चोरी पकडली गेली.