रेल्वे स्थानक परीसरात 40 वर्षीय अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळला

जळगाव : रेल्वेस्थानक परीसरात 40 वर्षीय अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आला आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.

दीर्घ आजाराने मृत्यू झाल्याचा अंदाज
जळगाव रेल्वे स्थानकातील रेल्वे मजदूर युनियनच्या कार्यालयासमोर मंगळवार, 10 मे रोजी दुपारी अनोळखी 40 वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळला. कोणत्यातरी दीर्घ आजाराने मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. लोहमार्ग पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी धाव घेत मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवला. मयताच्या हातावर दशरथ गशाके असे नाव गोंदलेले आहे. याबाबत लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताने अंगात आकाशी रंगाचा बनियान व हिरव्या रंगाची पॅन्ट परीधान आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन भुसावळ लोहमार्ग पोलीसांनी केले आहे. पुढील तपास हवालदार रवींद्र ठाकूर करीत आहे.