रॉयल पॅलेस हॉटेलच्या मालकाविरोधात गुन्हा

0

जळगाव। हॉटेलमध्ये येणार्‍या ग्राहकांच्या खोट्या नोंदी ठेऊन बनावट दस्ताऐवज तयार केल्याप्रकरणी हॉटेल रॉयल पॅलेसच्या मालकाविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जुलै 2015 रोजी हॉटेल रॉयल पॅलेस येथील एका खोलीत तलाठी घनश्याम लांबोळे हे एका युवतीसोबत आढळून आले होते. तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रवीण वाडिले यांनी अकस्मात तपासणी केल्यानंतर लांबोळे युवतीला ताब्यात घेतले होते. कारवाईनंतर लांबोळेंची सुटका करण्यात आली होती. तर हॉटेलमध्ये अटी शर्तींचा भंग करून रूम उपलब्ध करून दिल्या जात असल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी अ‍ॅड.विजय दाणेज यांनी न्यायालयात धाव घेतली होती. अ‍ॅड.दाणेज यांच्या फिर्यादीवरून प्रदीप गोपीचंद आहुजा अमित प्रदीप आहुजा (रा.दोघे जयनगर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज इंद्रेकर तपास करीत आहेत.