रोकडे येथील शेतकर्‍याची आत्महत्या

0

चाळीसगाव : शेती करण्यासाठी खासगी कर्ज व वि.का.सोसायटीचे कर्ज घेवून पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न झाले नाही म्हणून सतत तणावात असलेल्या तालुक्यातील रोकडे येथील अरूण रघुनाथ पाटील (38) या शेतकर्‍याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. गुरूवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास अनिल पाटील यांच्या शेतातील विहिरीत अरूण पाटील यांचा मृतदेह आढळून आला.

विहिरीत आढळला मृतदेह
अरुण पाटील यांच्या नावे रोकडे शिवारात कोरडवाहू जमिन आहे. जमीन कसण्यासाठी त्यांनी खासगी कर्ज व सोसायटीचे कर्ज घेतले होते. मात्र पाहिजे त्या प्रमाणात मक्याचे पीक आले नव्हते. त्यातच सोसायटीकडून 30 डिसेंबर 2016 पर्यंत कर्जाची फेड करा, अशी नोटीस आल्याने ते अधिकच तणावात होते. या तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. रोकडे येथील शिवाजी धर्मा पाटील हे सकाळी 7 वाजेच्या सुमारास शेतात जात असतांना अनिल पाटील यांच्या शेतात विहिरीतील अरूण पाटील यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलीस पाटील सुनिल भिकन पाटील यांनी खबर दिल्यावरुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक गणपत महिरे तपास करीत आहे.