रोकडेत नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू

0

चाळीसगाव- तालुक्यातील रोकडे गावाजवळील बाणगाव रस्त्यावरील सुपडू देवराम पाटील या शेतकर्‍याच्या शेतीच्या बांधावर बिबट्याचा मृतदेह सोमवारी दुपारी चार वाजता आढळल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकलेले नाही. याबाबतची माहिती माजी सरपंच संदीप पाटील, गोकुळ पाटील, सुनील पाटील यांनी वनविभागाला कळवल्यानंतर सामाजिक वनपरीक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांनी वनपाल देवरे, अजय महिरे यांना घटनास्थळी रवाना केले तर मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे हेदेखील घटनास्थळी रवाना झाले आहेत. दरम्यान, बिबट्याचा मृतदेहाचे मंगळवारी शवविच्छेदन केल्यानंतरही मृत्यूचे नेमके कारण कळणार असून हा बिबट्या नर जातीचा असल्याचे सांगण्यात आले.