A speeding truck crushed two devotees in the dust धुळे : रोकडोबा हनुमानाच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या दोघा भाविकांना पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने उडवल्याने दोघा भाविकांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, 13 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडला. किशोर थोरात (मनमाड जीन, धुळे) व राजू वाघारे (सहावी गल्ली, धुळे) अशी मयतांची नावे आहेत. वाघारे हे धुळे महापालिकेत कर्मचारी असल्याची माहिती आहे.
भल्या सकाळीच घडला अपघात
धुळे शहरापासून पंधरा किलोमीटर असलेले पुरातन रोकडोबा हनुमान मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त दर्शनासाठी शनिवारी सकाळी किशोर थोरात (मनमाड जीन, धुळे) व महापालिकेत कर्मचारी असलेले राजू वाघारे (सहावी गल्ली, धुळे) हे आपल्या मित्रांसमवेत पायी चालत असताना अवधान गावाच्या पुढे एमआयडीसी परीसरात मुंबई-आग्रा महामार्गावर मागून येणार्या भरधाव ट्रकने दोघांनाही धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला. या प्रकरणी वाहनचालकांविरोधात मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.